Lokrakshanay
Sunday, November 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष महाशिबिर यशस्वी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 21, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाण्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष महाशिबिर यशस्वी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने विशेष कार्यशाळा आणि महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमाला निवृत्तीवेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय, पेन्शनभोगी कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग आणि संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या देशव्यापी ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-५’ अंतर्गत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ११.०० ते १.०० या कालावधीत झालेल्या कार्यक्रमात डीओपीपीडब्ल्यूचे महानिदेशक डॉ. प्रमोद कुमार कौशिक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी सहसंचालक दत्तदास कराडकर, उपसंचालक प्रमोद पाटील आणि बँक ऑफ इंडियाचे केंद्रीय महाव्यवस्थापक सारंगी अंतर्यामी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण साळुंखे यांनी केले, तर सचिन हिरवे यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे महत्त्व अधोरेखित करत जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ ॲपचा वापर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुनिल भोईर यांनी ॲपची कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया आणि वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाशिबिरात जिल्ह्यातील विविध बँकांनी स्वतंत्र स्टॉल उभारून निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे जागेवरच तयार करून दिली. त्यामुळे हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली. जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भोईर आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

जगभरात ‘रामायण’ची सुवर्णघोडदौड; अवघ्या १६ दिवसांत १,५७४ कोटींची ऐतिहासिक कमाई

BreakingNews

ठाण्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष महाशिबिर यशस्वी

जगभरात ‘रामायण’ची सुवर्णघोडदौड; अवघ्या १६ दिवसांत १,५७४ कोटींची ऐतिहासिक कमाई

आरे रुग्णालयाची जागा ३० वर्षांसाठी पालिकेच्या ताब्यात; नव्या दवाखान्याला मंजुरी!

पुणेतील मत्स्यपालकांसाठी दिलासा; २४ शासकीय योजना आणि मासेमारी परवाना सेवा आता ऑनलाइन

नेहरू सेंटरमध्ये दर रविवारी मराठी नाट्यप्रयोग; नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध होणार

पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांना ‘नो एन्ट्री’; नागरिकांना थेट मदतीसाठी अधिकारी प्रवेशद्वारावर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check