Lokrakshanay
Friday, October 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 9, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासोबतच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता चौथी, सातवी आणि आठवी (एनएमएमएस) या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही सराव चाचणी घेण्यात आली. जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाने ओपन लिंक फाउंडेशनच्या तांत्रिक सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावे, परीक्षेपूर्वी त्यांना सरावाची संधी मिळावी आणि तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या सराव चाचणीमध्ये जिल्ह्यातील इयत्ता चौथी, सातवी आणि आठवीच्या एकूण १०,०६६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या तयारीचे मूल्यमापन करता आले तसेच कोणत्या विषयांमध्ये अधिक सरावाची आवश्यकता आहे, हे ओळखण्याची संधी मिळाली. परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होणार आहे.

‘मिशन भरारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची क्षमता विकसित करणे, नियमित अभ्यास आणि सरावाची सवय लावणे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, यावर भर देण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्या नियोजनातून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच संबंधित यंत्रणांनी या चाचणीच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाला पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वातावरणात सराव करण्याची संधी मिळाल्याने आणि त्यांच्या तयारीचे मूल्यमापन करता आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अशा प्रकारचे नियमित सराव उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणे, हा ‘मिशन भरारी’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांची क्षमता अधिक मजबूत होऊन शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभाग आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Previous Post

त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन ६० दिवस बंद राहणार; भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट

BreakingNews

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन ६० दिवस बंद राहणार; भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबईत ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सव; पार्थिव गोहिल यांचे थेट सादरीकरण ठरणार आकर्षण

किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील भटक्या श्वानांना मिळणार हक्काचा निवारा; पालिकेच्या १३.३५ कोटींच्या प्रकल्पाची जबाबदारी खासगी संस्थेकडे

जागतिक तेलदरवाढीचा भारतीय ग्राहकांना फटका; पेट्रोल ₹५ तर डिझेल ₹३ ने महागले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.