पालकांना मुलांच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी असते. परंतु आजकाल बहुतांश मुलं चिप्स, चॉकलेट्स इतर बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खातात. मुलांच्या जिद्दमुळे पालकही त्यांना काही म्हणत नाही. परंतु कधीकदी पालक स्वत: त्यांच्या मुलांना असे अन्न खायला देतात जे गंभीर नुकसान करू शकतात. पालक हे नकळत करतात. कारण बाजारातील काही पदार्थ निरोगी असल्याचे लेबल लावून लोकप्रिय होतात. परंतु प्रत्यक्षात ते निरोगी नसतात. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओबैदुर रहमान एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये अशीच एक गोष्ट शेअर केलीय. त्यांच्या मते ते पदार्थ चिप्सपेक्षाही जास्त हानिकारक आहेत आणि बहुतांश पालक नकळत ते आपल्या मुलांना दरोरज देतात.
डॉ. ओबैदुर रहमान स्पष्ट करतात की, तुम्ही तुमच्या मुलाला निरोगी समजून देत असलेल्या फळांचा रस चिप्सपेक्षा जास्त हानिकारक आहे. अनेक पालकांचा असा विश्वास आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या फळांच्या रसांमध्ये पोषक घटक असतात आणि ते त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु बाजारातील फळांच्या रसामध्ये जास्त प्रमाणात रिफाइंड साखर, औद्योगिक स्टार्च आणि कृत्रिम रंग आणि चव असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असण्याऐवजी हानिकारक आहे.
- ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतात की, मुलांना दररोज पॅकेज्ड फळांचा रस दिल्याने त्यांच्या आरोग्यावर लक्षणीय नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः, ते फॅटी लिव्हरचा धोका लक्षणीयरीत्या वाढवते. फॅटी लिव्हरच्या समस्या असलेल्या १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना दररोज फळांचा रस सेवन करताना आढळून आले आहे.
- डॉक्टर म्हणतात की, फळांच्या रसांमध्ये फळांमधील कोणतेही पोषक घटक नसतात. कारण ज्युस तयार करताना त्याती फायबर काढून टाकले जाते आणि रसात जास्त प्रमाणात रिफाइंड साखर, स्टार्च, कृत्रिम रंग मिसळले जातात. यामुळे शरीराला जास्त प्रमाणात फ्रुक्टोज मिळते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. शिवाय, ते एकूण आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
- डॉ. ओबैदुर रहमान स्पष्ट करतात की, फळांच्या रसांप्रमाणेच, क्रिम बिस्किटे देखील शरीराला जास्त प्रमाणात फ्रुक्टोज प्रदान करतात, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. त्यामध्ये जास्त प्रमाणात रिफाइंड साखर, स्टार्च, कृत्रिम चव आणि रंग असतात, जे शरीरासाठी खूप हानिकारक असतात.
- अनेक पालकांचा असा विश्वास आहे की, मुले लहान वयात जे काही खातात ते सहजपणे पचवू शकतात आणि त्यामुळे त्यांना नुकसान होणार नाही. परंतु, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. मुलांच्या योग्य वाढीसाठी, त्यांना पोषक तत्वांनी समृद्ध आणि चांगल्या प्रमाणात प्रथिने असलेले अन्न देणे आवश्यक आहे.

