वृत्तसंस्था : अभिनेता गोविंदा हा अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला त्याचे चाहते रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान गोविंदा हा सलमान खान स्टारर ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात गोविंदानं तो लवकरच पुनरागमन करणार असल्याची माहिती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. दरम्यान त्याचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो म्हणताना दिसत आहे, “मी तुम्हाला असे काही सांगणार आहे, जे मी यापूर्वी कधीही सांगितले नव्हते. आता वेदना आणि भीती गेली आहे. आता तुमचा हिरो, जो हिरोमधून ‘हिरो नंबर १’ बनला आहे, तो पुन्हा येत आहे. तुमचे प्रेम नेहमीच माझ्याबरोबर राहो.”
गोविंदा करणार चित्रपटसृष्टीत पुनरागमन : आता गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. त्याला आता प्रेक्षक नवीन अंदाजामध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कार्यक्रमामध्ये गोंविदानं जय श्री राम आणि जय बजरंग बली असाही जयघोष केला. याशिवाय त्यानं पुढं म्हटलं, “मी तुमच्या सेवेत आहे. मी तो गोविंदा आहे, जो गरिबीमधून आला आहे. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते, फक्त देव आणि माझ्या पालकांच्या आशीर्वादानं मला गोविंदापासून गोविंदा बनवले. तुमच्या प्रेमानं ते केलंय. तो गोविंदा परत येत आहे. हनुमान तुम्हाला आशीर्वाद देवो.” तसेच या कार्यक्रमात अभिनेत्यानं भजन देखील गायलं, याशिवाय त्यानं त्याच्या चाहत्यांना हस्तांदोलन देखील यावेळी केला. आता गोंविदा हा चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय होणार असं या व्हिडिओवरून दिसत आहे.

