Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक

कल्याण पश्चिमेतील हॉटेल गुरुदेव ॲनेक्स परिसरात या महिलेला अटक करण्यात आली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : २० ते ३० वयोगटातील तरूणींना विविध ठिकाणी काम देण्याचे आमिष दाखवून इतर शहरांमधून कल्याणमध्ये आणायचे. त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून पैसे कमविणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. अनामिका राजू छत्री (२२, रा. मातोश्री इमारत, वर्सोवा मंदिर समोर, अंधेरी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती मुळची आसाम गुवाहाटी भागातील रहिवासी आहे. कल्याण पश्चिमेतील हॉटेल गुरुदेव ॲनेक्स परिसरात या महिलेला अटक करण्यात आली आहे. एक महिला तरूणींना वेश्या व्यवसायात ओढून त्या माध्यमातून पैसे कमवित आहे आणि पीडित तरूणींची फसवणूक करत आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस या महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत आरोपी अनामिका राजू हिने उल्हासनगर भागातून एक गरजू तरूणीला पैशाचे आमिष दाखवून सोबत घेतले. नंतर तिला कल्याण येथे आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे अनामिक दररोज अनेक मुलींची फसवणूक करत असल्याच्या गुप्त तक्रारी खडकपाडा पोलिसांना प्राप्त होत होत्या. त्यामुळे पोलीस या महिलेच्या मागावर होते.

गेल्या शुक्रवारी अनामिक कल्याण-खडकपाडा रस्त्यावर एका तरूणीला वेश्या व्यवसायासाठी घेऊन येणार आहे अशी माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या भागात सापळा लावला. त्यावेळी अनामिका, पीडित तरूणी आणि एक ग्राहक असे एकत्रितरित्या पोलिसांना दिसले. या कारवाईत पोलिसांनी अनामिका राजू हिला अटक केली. तिच्याकडे ग्राहकांकडून मिळालेले पैसे आढळून आले. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

३०० घड्याळांची चोरी, अखेर ‘काळू’ पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला

Next Post

सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केल्याचे उघड; समाजमाध्यमात पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट खाते

Next Post
सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केल्याचे उघड; समाजमाध्यमात पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट खाते

सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केल्याचे उघड; समाजमाध्यमात पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट खाते

BreakingNews

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.