Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लू या आजारांच्या तुलनेमध्ये डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 28, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात साथीचे आजार डोके वर काढतात. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात डेंग्यूचा उपद्रव सर्वाधिक असून, या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे १३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लू या आजारांच्या तुलनेमध्ये डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात २०२० ते २१ जून २०२४ पर्यंत डेंग्यूमुळे १३५ जणांना जीव गमवावा लागला. साथीच्या इतर आजारांच्या तुनलनेत ही संख्या अधिक आहे. २०२० मध्ये डेंग्यूमुळे दहा, तर २०२१ मध्ये ४२, २०२२ मध्ये २७, तर २०२३ मध्ये ५५ जणांना जीव गमवावा लागला होता. यंदा २१ जून २०२४ पर्यंत राज्यात डेंग्यूमुळे एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला आहे. या साडेचार वर्षांच्या कालावधीमध्ये डेंग्यूच्या ४६ हजार ४९० रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे २०२३ मध्ये नोंदवण्यात आले. त्यावेळी ही संख्या १९,०३४ होती. याच कालावधीमध्ये मलेरियामुळे ७४ जणांचे प्राण गेले. राज्यात ६८ हजार ३४५ जणांना मलेरियाची लागण झाली होती. मात्र, मृतांची संख्या डेंग्यूच्या तुलनेत कमी होती, असे माहितीवरून दिसून येते. चिकनगुनियाची रुग्णसंख्या इतर आजारांच्या तुलनेमध्ये कमी होती.

चार वर्षांत ६८३८ जणांना चिकनगुनिया झाला होता. राज्यात या आजारामुळे एकाच्याही मृत्यूची नोंद नाही. २०२१ मध्ये चिकनगुनियाची सर्वाधिक म्हणजे २५२६ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. इतर वर्षांमध्ये ही रुग्णसंख्या तुलनेने कमी होती. यंदा २१ जून २०२४ पर्यंत सर्वांत कमी म्हणजे ७४१ जणांना या आजाराची लागण झाली. चिकनगुनिया विषाणूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय या डासांपासून होतो.

Previous Post

न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

Next Post

एमएमआरडीएच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय ; मेट्रो १ खरेदी प्रक्रिया रद्द!

Next Post
एमएमआरडीएच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय ; मेट्रो १ खरेदी प्रक्रिया रद्द!

एमएमआरडीएच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय ; मेट्रो १ खरेदी प्रक्रिया रद्द!

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.