Lokrakshanay
Friday, November 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 18, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : पनवेल शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः खाडीलगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये डासांचे प्रमाण अधिक असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून धूर आणि जंतुनाशक फवारणीसाठी शंभर कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी केवळ फवारणी न करता डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कामोठे सेक्टर ३६ येथील रवी हाइट्स सोसायटीतील रहिवासी आणि जे. जे. रुग्णालयाचे सेवानिवृत्त डॉक्टर माधवराव लंकेश्वर यांनी वाढत्या डासांच्या समस्येकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ नागरिकांना इमारतीखाली बसणेही कठीण झाले असून, महापालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली. खाडीलगतच्या परिसरात डासांची उत्पत्ती अधिक होत असल्याने या भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल महापालिकेचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले की, डास नियंत्रणासाठी शहरभर धूर आणि जंतुनाशक फवारणी सुरू असून त्यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य केंद्रांतील डॉक्टर दररोज रक्तचाचण्यांच्या अहवालांचे परीक्षण करून आजारांचा वाढता प्रादुर्भाव असलेल्या भागांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देतात. त्यानुसार साचलेले पाणी, अंधाऱ्या जागा आणि डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून जंतुनाशक फवारणी केली जाते. फवारणीनंतर छायाचित्रे आणि सोसायटीतील रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे कामाची नोंदही ठेवली जाते. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संशयित ५२,२२३ मलेरिया रुग्णांच्या चाचण्यांपैकी ६१५ रुग्ण मलेरियाचे आढळले, तर संशयित ३,२५४ डेंग्यू रुग्णांच्या चाचण्यांमध्ये ५४० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण, रक्तचाचण्या, तातडीचे उपचार, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, फवारणी, फॉगिंग तसेच बांधकामस्थळे, झोपडपट्ट्या आणि औद्योगिक परिसरांची नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. तसेच नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि डास प्रतिबंधक उपायांचे पालन करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

Previous Post

ब्रिक्स+ चित्रपट महोत्सवात छाया कदम यांचा सन्मान; ‘स्नो फ्लॉवर’मधील अभिनयाला आंतरराष्ट्रीय गौरव

Next Post

दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

Next Post
दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

दाऊदशी संबंधित 'मुसाफिरखाना' इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

BreakingNews

विलेपार्लेतील महात्मा गांधी मार्गावर अतिक्रमणांवर हातोडा; ‘पादचारी प्रथम’ मोहिमेअंतर्गत ६५० मीटर पदपथ मोकळा

धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांचा मुंबई पोलिसांकडे धाव; X कॅटेगरी सुरक्षेची मागणी

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी BMCचा पुढाकार; ‘द ओशन क्लीनअप’सोबत सामंजस्य करार

२०२७ मधील केंद्र सरकारी सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर; १७ अनिवार्य सुट्ट्या, आवडीच्या दोन सुट्ट्यांचीही संधी

दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check