Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार ५० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले

५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार ५० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडे ६० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पिंपळेसौदागर पोलीस चौकी येथे करण्यात आली. सुनील शहाजी जाधव (वय ४९) असे रंगेहाथ पकडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ते सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळेसौदागर येथे चालू आहे. या बांधकामाचे कंत्राट बांधकाम व्यवसायिक कराळे यांना दिले होते. घराच्या बांधकामाबाबत ठेकेदार कराळे व तक्रारदार यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. तक्रारदार यांच्या ताब्यात असलेले बांधकामाचे साहित्य ठेकेदार हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते. परंतु, बांधकाम पूर्ण झाल्यावर कराळे यांचे बांधकाम साहित्य देण्यात येईल, असे तक्रारदार यांनी कराळे यांना सांगितले. त्यामुळे कराळे यांनी तक्रारदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या तक्रारीवरून तक्रारदार यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे पहिल्यांदा ६० हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तसेच, ५० हजाराची लाचेची रक्कम दोन टप्प्यात देण्यास सांगितले. याप्रकरणी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा रचला. पिंपळे – सौदागर पोलीस चौकी येथे तक्रारदार यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील २५ हजार रूपये लाच स्वीकारताना जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक

Next Post

नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक

Next Post
नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक

नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक

BreakingNews

CID मध्ये मृतदेहाची भूमिका, दिवसाला मिळायचे एवढे रुपये; अर्चना गौतमने सांगितला संघर्षाचा प्रवास!

कार्यालयांचे फेरे टळले, परवानग्यांची प्रक्रिया आता ऑनलाईन! गणेश मंडळांना मोठा दिलासा

एफआयआर कॉपी न दिल्याने वाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड!

ठाणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ३९ कोटींचे अंमली पदार्थ कायमचे नष्ट!

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला गती; अत्याधुनिक उपचारांसाठी शासन कटिबद्ध – सुनेत्रा अजित पवार

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.