Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 2, 2026
in मनोरंजन
स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही अभिनेता आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीनं एक विशेष स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. आता आम्ही ‘सिंघम’ स्टार अजय देवगणबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. २ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस असून तो आज ५७ वर्षांचा झाला आहे. हा दिवस अभिनेत्यासाठी खूप विशेष आहे. अभिनेत्यानं परिश्रम आणि संघर्षातून आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. त्यानं चित्रपटसृष्टीत अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. यात ‘दृश्यम’, ‘तान्हाजी’, ‘टोटल धमाल’, ‘सिंघम’, ‘शैतान’, ‘रेड’ आणि ‘गोलमाल’ यांचा समावेश आहे.

याशिवाय अभिनेत्यानं आर. माधवनबरोबर ‘शैतान’ चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट हिट ठरला होता. दरम्यान अजय देवगणनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्यानं धोकादायक स्टंट केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर, त्यानं ‘जिगर’, ‘एक ही रास्ता’, ‘बेदर्दी’, ‘दिलवाले’, ‘विजयपथ’, ‘सुहाग’, ‘नायाज’, ‘गुंडराज’, ‘दिलजले’, ‘जंग’, ‘इश्क’, ‘जख्म’, ‘प्यार तो होना ही था’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘युवा’ आणि ‘गंगाजल’ यांसारख्या अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनं जिंकलं होतं. अजय आताही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अजय देवगणचे वडील, वीरू देवगण, एक गँगस्टर होते, असं अभिनेत्यानं अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं. ते लहान वयातच घरातून पळून गेले आणि कंगाल अवस्थेत मुंबईत आले होते. अजयनं पुढं सांगितलं होतं की, त्याचे वडील वीरू यांच्याकडे पैसे आणि राहायला जागा नसल्यामुळं त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर, एका माणसानं त्यांना राहण्याची सोय आणि गाड्या धुण्याचे काम दिलं. त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. अखेर सायन-कोळीवाडा भागातील ते गँगस्टर बनले. एका छोट्याशा रस्त्यावरील मारामारीदरम्यान, प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक रवी खन्ना यांनी त्यांना पाहिलं. त्यानंतर त्यांनी अजय देवगणचे वडील वीरू यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करण्याची संधी दिली. यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांनी ८०-९० च्या दशकात ते इंडस्ट्रीतील सर्वात दमदार स्टंटमॅनपैकी एक म्हणून उदयास आले. दरम्यान अजय देवगणनं इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून खूप जास्त मेहनत केली. तसेच अभिनेत्याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडे अंदाजे ४५० कोटींची मालमत्ता असल्याचं म्हटले जाते.

Previous Post

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

Next Post

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

Next Post
ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

BreakingNews

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.