ठाणे,दि.10: प्रशिक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था (रजि.) महाराष्ट्र राज्य व नवयुग सिध्दार्थ क्रीडा मंडळ, अशोकनगर, वालधुनी, कल्याण (पूर्व) यांच्या सहकार्याने नुकतेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, अशोक नगर वालधुनी कल्याण येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात जवळपास 125 ते 140 व्यक्तींनी सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी, त्वचारोग व सर्वसाधारण आजार असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात अपोलो हॉस्पिटलचे आरोग्य पथकातील श्री.मनोज गुप्ता यांच्यासह डॉ.रेखा गायकवाड, डॉ.शतानवानजी हे कार्यरत होते. जायंट ग्रुप – जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन, डोंबिवली युनिट 1 चे डॉ.विकास जोशी व त्यांचे आरोग्य पथक यांनीही सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे भैरव सेवा समिती, भिवंडी यांचे पथकही सामील होते. तसेच डॉ.अशोक लोंढे व डॉ.शशिकांत ननावरे यांच्या पथकाने सहभाग नोंदवून लाभार्थ्यांची सर्वसाधारण तपासणी केली तर डॉ.ननावरे आणि डॉ.रवींद्र जाधव व त्यांच्या डॉ.सुरेखा जाधव यांनी रुग्णांची तपासणी करून औषधांचे वाटपही केले. या शिबिरात सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी विनामूल्य आपला वेळ व सेवा प्रदान केली.
तत्पूर्वी दि.24 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेच्या उद्द्देशिकेचे वाचन संस्थेचे अध्यक्ष आयु. यशवंतराव गायकवाड यांनी केले. त्यास उपस्थित सर्व जनसमुदयाने एका स्वरात प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, नवी मुंबई, पनवेल येथील संविधान अभ्यासक आयु, प्रा.बाबूराव बनसोडे यांनी उपस्थित जनसमुदयास भारतीय राज्यघटनेचे महत्त्व पटवून दिले.
प्रशिक संस्थेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष बी. डी. जाधव, उपाध्यक्ष यशवंतराव भालेराव, अशोक दुधसागरे, कोषाध्यक्ष शांताराम गायकवाड, सहसचिव विजय थुले, पी.डी निकुंभ, सुधाकर जाधव, ज्येष्ठ सदस्य एस. डी. मोरे, ॲड.लभाणे आणि सदस्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकम यशस्वी झाला, असे प्रशिक अधिकारी-कर्मचारी संस्थेचे सचिव रंगनाथ गरुड यांनी कळविले आहे.