Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

स्टीलमार्केट नंतर आता ईव्ही मार्केटमध्ये पदार्पण करणार – जेएसडब्ल्यू ग्रुप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 2, 2024
in ताज्या बातम्या
स्टीलमार्केट नंतर आता ईव्ही मार्केटमध्ये पदार्पण करणार – जेएसडब्ल्यू ग्रुप
Share on FacebookShare on Whatsapp

स्टील मार्केटमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केल्यानंतर आता जेएसडब्ल्यू ग्रुप आता ईव्ही च्या मार्केट मध्ये उतरण्याची तयारी करत आहे. जेएसडब्ल्यू ग्रुप म्हणजेच जिंदाल स्टील वर्क्स आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू ग्रुपने HI.COM काही महिन्यांपूर्वी एमजी मोटर इंडियामध्ये जवळपास 1500 कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती आणि एमजी ब्रँडची मालकी असलेल्या चीनच्या SAIC Motor सह जॉइंट व्हेंचर बनवले होते.

जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, जेएसडब्ल्यू ग्रुप आता स्वतःचा ईव्ही ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीतसुद्धा आहे. टाटा आणि महिंद्रा या भारतातील कंपन्या आहेत, ज्या पूर्णपणे होम ग्रोन ईव्ही ब्रँड आहेत. आता जेएसडब्ल्यू ग्रुप देखील ईव्हीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

ईटीच्या एका रिपोर्टनुसार, सज्जन जिंदाल यांचे म्हणणे आहे की, त्यांना भारतात फक्त चीनी कंपनीचे (एमजी मोटर) विक्रेता म्हणून राहायचे नाही, परंतु त्यांना भारतातच प्रोडक्ट बनवून व्हॅल्यू एडिशन करायचे आहे. तसेच, त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या गाड्या भारतात विकायच्या आहेत.

दरम्यान, एमजी मोटर हा ब्रिटीश ब्रँड आहे, परंतु आज तो चीनच्या SAIC Motor च्या मालकीचा आहे, जी चीन देशाची सरकारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी जिंदाल ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये 35 टक्के हिस्सा खरेदी करून जॉइंट व्हेंचर बनवले होते. या जॉइंट व्हेंचरची पहिली कार MG Windsor EV भारतात लाँच झाली आहे आणि ती Tata Nexon EV ला चांगलीच टक्कर देत आहे.

Previous Post

राज्य पातळीवर जबाबदारी माझ्यावर दिली तर ती मी स्वीकारणार – रोहित पवार

Next Post

उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत भर. सेबीची कारवाई, खाती गोठवली.

Next Post
उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत भर. सेबीची कारवाई, खाती गोठवली.

उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत भर. सेबीची कारवाई, खाती गोठवली.

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.