Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

‘कलम ४९८ अ’चा महिलांकडून मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत आहे – सर्वोच्च न्यायालय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2024
in देश -विदेश, राष्ट्रीय
‘कलम ४९८ अ’चा महिलांकडून मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत आहे – सर्वोच्च न्यायालय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : विवाहित महिलांच्या पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळास शिक्षा करणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी म्हटले आहे.
दारा लक्ष्मी नारायण आणि इतर विरुद्ध तेलंगणा राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी खंडपीठाने म्हटले, ज्या तरतुदीचा मूळ उद्देश महिलांना कौटुंबिक हिंसाचार आणि छळापासून संरक्षण करणे हा आहे, त्याचा काही महिलांकडून त्यांच्या पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडण्यासाठी करण्यात येत असल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, अलिकडच्या काही वर्षांत देशभरात वैवाहिक विवादांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच विवाह संस्थेतील वाढत्या कलह आणि तणावामुळे पती आणि त्याच्या कुटुंबाविरूद्ध पत्नीकडून वैयक्तिक सूड उगवला गेला आहे. वैवाहिक विवादांदरम्यान अस्पष्ट आरोप करून भादंविच्या कलम ४९८ अ सारख्या तरतुदींचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची तपासणी न झाल्यास कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल.
तेलंगणा उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिल्याच्या विरोधात पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असता पत्नीने पती व सासरच्यांविरुद्ध वरील गुन्हे दाखल केले होते. युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने असे मानले की पत्नीने दाखल केलेले खटले वैयक्तिक नाराजी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी होते आणि पत्नी मूळत: तिच्या संरक्षणासाठी असलेल्या तरतुदींचा गैरवापर करत होती

Previous Post

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी

Next Post

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर 31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

Next Post
कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर  31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर 31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.